News Flash

रेल्वेचे वायफाय सहा हजाराव्या स्थानकावर

रेल टेल या सार्वजनिक मालकीच्या कंपनीकडून ही सेवा रेल्वेवर आर्थिक भार पडू न देता दिली जात आहे.

नवी दिल्ली : देशात झारखंडमधील हजारीबाग शहरातील रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय शनिवारी सुरू करण्यात आले असून वाय फाय सुविधा असलेले ते सहा हजारावे स्थानक ठरले आहे.

रेल्वेने वायफाय सुविधा मुंबई रेल्वे स्थानकावर २०१६ मध्ये मोफत सुरू केली होती. त्यानंतर पाच हजार स्थानकांवर ती उपलब्ध करण्यात आली. त्यात मिदनापूर हे पाच हजारावे रेल्वे स्थानक होते. १५ मे रोजी ओडिशातील अंगुल जिल्ह्य़ात जरपडा येथे  वायफाय सेवा सुरू करण्यात आले. वायफाय सेवा रेल्वे स्थानकांवर मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे भारत सरकराच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाला पाठबळ मिळाले आहे. ग्रामीण व शहरी नागरिक आता डिजिटल साधनांचा वापर करू शकतात. वायफाय सुविधा सध्या सहा हजार रेल्वे स्थानकांवर मोफत देण्यात आली आहे.

रेल टेल या सार्वजनिक मालकीच्या कंपनीकडून ही सेवा रेल्वेवर आर्थिक भार पडू न देता दिली जात आहे. यात गुगल व दूरसंचार मंत्रालय, पीजीसीआयएल, टाटा ट्रस्ट यांचे सहकार्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 12:12 am

Web Title: indian railways commissions wi fi facility at 6000th station zws 70
Next Stories
1 मध्य प्रदेशात दहा दिवसांत चार वाघांचा मृत्यू
2 ‘तुमच्या राज्यातल्या लोकांवर लक्ष द्या’; योगींना पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा सल्ला!
3 Corona: भारत आणि ब्रिटेन स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन प्रभावी; भारत बायोटेकचा दावा
Just Now!
X