News Flash

प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीसह जाहिराती, दुकानांद्वारे रेल्वेची वर्षभरात ३५० कोटींची कमाई

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची राज्यसभेत माहिती

भारतीय रेल्वेने २०१८ -१९ या कालावधीत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री, प्लॅटफॉर्मवर असलेल्या विविध जाहिराती व दुकानांद्वारे जवळपास ३५० कोटी रूपयांची कमाई केली आहे. प्लॅटफॉर्म तिकीट  विक्रीतून १३९.२० कोटी रूपये तर  रेल्वे स्थानाकांमधील प्लॅटफॉर्मवर असलेल्या विविध जाहिराती व दुकानांद्वारे देखील रेल्वेची २३०.४७ कोटींची कमाई झाली असल्याची माहिती,  केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.

मागिल महिन्यातच गोयल यांनी माहिती दिली होती की, भारतीय रेल्वेने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये २०४.१० कोटी व २०१८-१९ मध्ये २२३.५३ कोटी रूपये भाडे बाह्य महसूलद्वारे कमावले आहेत.

तर, काही दिवस अगोदरच त्यांनी रेल्वेचे खासगीकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हणत, राष्ट्रीय हितासाठी काही रेल्वेमार्ग व प्रकल्प यात खासगी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली असल्याचे सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 4:10 pm

Web Title: indian railways earned in excess of rs 350 crore msr 87
Next Stories
1 अनुराग कश्यपला जीवे मारण्याची धमकी
2 “26/11 च्या हल्ल्यासाठी गुगल मॅप्स आणि इमेजेसचा वापर”, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका
3 आझम खानविरोधात संसदेत एकवटली स्त्री शक्ती
Just Now!
X