News Flash

रेल्वेच्या तात्काळ शुल्कात ३३ टक्क्यांपर्यंत वाढ, प्रवाशांना फटका

शुक्रवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे

संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर लगेचच रेल्वेकडून तात्काळ तिकीटांच्या शुल्कात ३३ टक्क्यांची वाढ घोषित करण्यात आली. यामुळे तात्काळ तिकीटांच्या माध्यमातून रेल्वे प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला फटका बसणार आहे. शुक्रवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे. तात्काळ तिकीट शुल्कामध्ये १० ते १०० रुपयांच्या दरम्यान वाढ करण्यात आली आहे.
वातानुकूलित तृतीय श्रेणीचे तात्काळ शुल्क २५० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. तर वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे तात्काळ शुल्क ३०० हून ४०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह श्रेणीसाठी तात्काळ शुल्क ४०० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. शयनयान श्रेणीसाठी तात्काळ शुल्क कमीत कमी ९० हून १०० रुपयांपर्यंत तर कमाल १७५ हून २०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. प्रवाशांना रेल्वेच्या निर्धारित तिकीटाव्यतिरिक्त तात्काळ आरक्षणासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. त्यामध्ये ही वाढ करण्यात आली आहे. मूळ तिकीट दरात वाढ करण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 12:03 pm

Web Title: indian railways hikes tatkal ticket charges
Next Stories
1 अपघातांत केवळ जवानच कसे मरतात?
2 खासदारांचे वेतन दुप्पट?
3 सभागृहात पंतप्रधानांच्या विरोधात घोषणा न देण्याचे सोनियांचे निर्देश
Just Now!
X