25 January 2021

News Flash

रुपयाचा ऐतिहासिक तळ, डॉलरमागे ७३ ची वेस ओलांडली

अमेरिकी डॉलरपुढे रुपयाचे विनिमय मूल्य निरंतर नवीन नीचांक गाठताना दिसत आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात रुपया ३४ पैशांच्या घसरणीने प्रति डॉलर ७३.३४ असा विक्रमी तळ रुपयाने

प्रतिकात्मक छायाचित्र

रुपयाचा विक्रमी तळातील प्रवास दिवसागणिक सुरूच असून डॉलरच्या तुलनेत रुपयाची बुधवारी ऐतिहासिक घसरण झाली. रुपयाने अमेरिकी डॉलरमागे बुधवारी सकाळी ७३.३४ असा नवीन ऐतिहासिक तळ दाखवला.

अमेरिकी डॉलरपुढे रुपयाचे विनिमय मूल्य निरंतर नवीन नीचांक गाठताना दिसत आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात रुपया ३४ पैशांच्या घसरणीने प्रति डॉलर ७३.३४ असा विक्रमी तळ रुपयाने दाखवला.

खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती प्रति पिंप ८५ डॉलर पर्यंत पोहोचल्या आहेत. प्रमुख आशियाई चलनांच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वेगाने घसरत असून देशाची ८० टक्के इंधन गरज आयातीद्वारे भागविणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी रुपयाची घसरण चिंतेचा विषय ठरत आहे. इंधन महागल्याने यामुळे महागाई वाढण्याची दाट शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2018 9:42 am

Web Title: indian rupee at record low now at 73 rs 33 versus the us dollar
Next Stories
1 पाच वर्षात पाच हजार बायोगॅस निर्मिती प्रकल्पांचे लक्ष्य
2 ‘रुपी बँके’च्या विलीनीकरणाचा ‘टीजेएसबी’चा प्रस्ताव
3 ‘पीएनबी’च्या कर्जवसुलीत सुधारणा
Just Now!
X