27 October 2020

News Flash

पाकिस्तानी सैनिकांना ईदीच्या शुभेच्छा देण्याच्या प्रथेला यंदा फाटा

जम्मू व काश्मिरमध्ये पाकिस्तान सातत्यानं करत असलेल्या शस्त्रसंधीच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

भारताच्या सीमा सुरक्षा जवानांनी यंदा पाकिस्तानी सैनिकांना ईदीच्या दिवशी मिठाई देऊन शुभेच्छा देण्यास नकार दर्शवला आहे. भारत पाकिस्तानचे सैनिक ईदीच्या दिवशी एकमेकांना मिठाई देत शुभेच्छा देण्याची परंपरा आहे. मात्र आज भारतीय सैन्यानं या परंपरेला छेद दिला आहे.
जम्मू व काश्मिरमध्ये पाकिस्तान सातत्यानं करत असलेल्या शस्त्रसंधीच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या भारत व पाकिस्तानमध्ये अत्यंत तणावाचे वातावरण असून त्याचे प्रतिबिंब ईदीच्या या प्रतीकात्मक शुभेच्छा नाकारण्यात उमटलं आहे.

आज सकाळी काश्मिरमधल्या नौशेरा भागात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद होण्याची घटनाही घडली आहे. दोन्ही देशांचे सैनिक ईद व दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणांच्यावेळी एकमेकांना शुभेच्छा देण्याची परंपरा आहे.तसेच स्वातंत्र्य दिन व गणतंत्र दिनीही शुभेच्छांची आदानप्रदान केली जाते. यंदाच्या गणतंत्र दिनी भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानी सैनिकांना दोन्ही देशांमध्ये चकमकी होत असतानाही मिठाई देत शुभेच्छा दिल्या होत्या.

पाकिस्तानी सैन्यााकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सगळ्यात जास्त या वर्षी झालं आहे. त्यामुळे भारतानं आता पवित्रा बदलला असून सणासुदीला पाकिस्तानी सैनिकांना मिठाई देत शुभेच्छा देण्याच्या परंपरेला फाटा देण्याचे ठरवल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 3:21 pm

Web Title: indian soldiers did not wish pak soldiers on id
Next Stories
1 ईदच्या दिवशीही पाकिस्तानची नापाक हरकत, सीमेवर २१ वर्षांचा जवान शहीद
2 हिमाचल प्रदेशात ट्रेकसाठी गेलेल्या बदलापूरच्या ट्रेकरचा मृत्यू
3 मुंबईहून हिमाचल प्रदेशात गेलेल्या 12 पैकी 11 ट्रेकर्सची सुटका, एकाचा मृत्यू
Just Now!
X