भारतातील अठरा वर्षांच्या एका विद्यार्थ्यांस बलात्काराच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. एका विद्यार्थिनीच्या खोलीत घुसून त्याने लैंगिक गैरवर्तन केले होते. अभय पंत असे या मुलाचे नाव असून तो नवी दिल्लीचा आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क राज्यात ओसेवेगो येथे द स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथे शिकत होता. विद्यापाठ आवारातील द ओसवेगोनियन वृत्तपत्रानुसार पंत याला गेल्या आठवडय़ात विद्यापीठ पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. सार्वजनिक कामकाज विभागाच्या संचालक ज्युली ब्लिसर्ट यांनी सांगितले, की पंत याने संबंधित मुलीच्या खोलीत घुसून तिच्याशी गैरवर्तन केले होते. पंत याच्यावर ओसवेगो शहर न्यायालयात आरोप ठेवण्यात आले असून त्याला ५० हजार डॉलरचा जामीन देण्यात आला असून १ लाख डॉलरचे बंधपत्रही घेण्यात आले आहे व त्याला पुन्हा न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. लैंगिक अत्याचार करणाऱ्या कुणालाही महाविद्यालयात राहता येणार नाही, असे ओसवेहोचे अध्यक्ष देबोरा स्टॅनले यांनी सांगितले.