News Flash

विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या, दुबईत भारतीय तरुणाला जन्मठेप

गेल्या वर्षी घडली होती घटना

संग्रहित छायाचित्र

दुबईत एका तरुणाने त्याच्या पत्नीची विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून हत्या केली. या हत्येप्रकरणी या तरुणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ९ सप्टेंबर २०१९ रोजी दुबईत राहणाऱ्या युगेश नावाच्या तरुणाने त्याच्या पत्नीची दिवसा ढवळ्या चाकूने भोसकून हत्या केली. याच प्रकरणात या तरुणाला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गल्फ न्यूजने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

पत्नीची हत्या केल्याप्रकरणी दुबई कोर्टात खटला सुरु होता. आरोपी युगेशला शिक्षा सुनावण्यात आली आहे. हत्येपूर्वी युगेश एका वर्षापासून पत्नीवर अत्याचार करत होता, असा आरोप युगेशच्या पत्नीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

आणखी वाचा- धक्कादायक, घरात कोणी नाही पाहून सासऱ्याने सुनेकडे केली शरीरसुखाची मागणी

जेव्हा युगेशने भर दिवसा चाकूने भोसकून त्याच्या पत्नीची हत्या केली तेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सुमारे मागच्या वर्षभरापासून खटला सुरु होता. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन युगेशने तिची हत्या केल्याची कबुली दिली होती. आता या प्रकरणी युगेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 4:51 pm

Web Title: indian who killed wife in dubai over suspicion of affair jailed scj 81
Next Stories
1 मोदींसारखं सक्षम नेतृत्त्व नसतं तर १३० कोटी जनता असुरक्षित असती – जे पी नड्डा
2 लग्नासाठी मुलगी कोर्टात आली आणि कुटुंबीयच ओरडले, आमची मुलगी करोना पॉझिटिव्ह त्यानंतर…
3 शिवसेनेचं अधःपतन, उद्धव ठाकरेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे ढोंगीपणा – विहिंपची टीका
Just Now!
X