संयुक्त अरब अमिरातीमध्ये एका ३२ वर्षाच्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अनिल निनान असे मृताचे नाव आहे. घराला आग लागलेली असताना, पत्नीला वाचवताना अनिल निनान गंभीररित्या भाजले होते. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार मागच्या आठवडयात अबूधाबीमध्ये ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल निनान हे मूळचे केरळचे आहेत. खालीज टाइम्सच्या वृत्तानुसार अनिल निनान या आगीमध्ये ९० टक्के होरपळले होते. त्यांची पत्नी नीनू सुद्धा जखमी झाली आहे. पण तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. “आमच्यासाठी हा कठीण काळ आहे. नीनूच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. ती सुरक्षित आहे. पण अनिलच्या मृत्यूने आम्हाला धक्का बसला आहे” असे एका जवळच्या नातेवाईकाने सांगितले.

शॉर्ट सर्कीटमुळे घरामध्ये ही आग लागल्याची शक्यता आहे. “नेमकं त्यावेळी काय घडलं ते आम्हालाही माहित नाही. पण कॉरिडोअरमध्ये असताना नीनूला प्रथम आगीच्या ज्वाळांनी वेढलं. अनिल बेडरुममध्ये होता. पत्नीला वाचवण्यासाठी तो कॉरिडोअरच्या दिशेने धावला. त्यावेळी पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात अनिल आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळला” असे सोजान थॉम्स यांनी सांगितले.

या जोडप्याचा चार वर्षांचा मुलगा सुद्धा जखमी झाला आहे. उम अल कुवेन येथील शेख खलिफा जनरल हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केले होते. त्याला आता अबुधाबीच्या मफराक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian who suffered burns while trying to save wife at home in uae dies dmp
First published on: 17-02-2020 at 16:11 IST