News Flash

‘सुषमाजी, माझ्या बहिणीला वाचवा, अन्यथा ती आत्महत्या करेल’

सौदी अरेबियात भारतीय महिलेवर अत्याचार

रियाधमध्ये अडकलेल्या बहिणीच्या सुटकेसाठी रेश्मा हिने सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली आहे. (एएनआय)

सौदी अरेबियातील रियाधमध्ये भारतीय महिलेवर मानसिक आणि लैंगिक अत्याचार होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत पीडित महिलेच्या बहिणीने ‘एएनआय’ला ही माहिती दिली. तिला रियाधमध्ये एका खोलीत डांबून ठेवण्यात आले असून तिच्या सुटकेसाठी मदत करावी, अशी विनंती त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे.

हुमेरा असे पीडित महिलेचे नाव असून ती हैदराबाद येथील रहिवासी आहे. गेल्या महिन्यात ती रियाधला गेली होती. तिथे तिच्यावर मानसिक आणि लैंगिक अत्याचार केले जात आहे, असे तिची बहिण रेश्मा हिने सांगितले. हुमेराला बेदम मारहाण आली. तिला जेवणही दिले जात नव्हते. एका कर्मचाऱ्याने तिला मारहाण केली आणि फरफटत घेऊन गेला. त्याच्या तावडीतून तिने सुटका करून घेतली आहे. एका खोलीत तिला चार-पाच दिवसांपासून डांबून ठेवण्यात आले होते. येथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर ठार मारीन, अशी धमकीही तिला दिल्याचे रेश्माने सांगितले.

एका एजंटच्या ओळखीने ती २३ जुलैला रियाधला गेली होती. तिथे केअरटेकर म्हणून नोकरी मिळवून देतो, महिन्याला २५ हजार रुपये पगार मिळेल, असे प्रलोभन त्याने दिले होते. पण तिथे गेल्यावर तिला एका खोलीत डांबून ठेवले. तिला मारहाण करण्यात येत होती. तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होते, असे रेश्माने सांगितले. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पण पोलिसांनी संबंधित एजंटविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप रेश्माने केला. हुमेराच्या सुटकेसाठी रेश्माने सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली आहे. हुमराची मदत केली नाही तर ती आत्महत्या करेल, असे तिने स्वराज यांना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 12:39 pm

Web Title: indian woman faces sexual harassment in riyadh sisters seeks sushma swaraj help
Next Stories
1 ‘ऑगस्ट क्रांती’मध्ये लाखोंची चोरी; प्रवाशांनीच हात साफ केल्याचा संशय
2 ‘या’बाबतीत भारत जगात अव्वल ठरणार!
3 सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचा उपचारास नकार; महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म
Just Now!
X