News Flash

Video : पाकिस्तानात बळजबरीने लग्न लावलेली भारतीय महिला मायदेशी परतली

उझमाने पतीला भेटण्यास नकार दिला.

उझमा मुळची नवी दिल्लीची आहे.

पाकिस्तानी व्यक्तीने बंदुकीच्या धाकाने विवाह केला, असा आरोप करणारी व गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयात वास्तव्यास असणारी उझमा भारतामध्ये परतली आहे. अटारी-वाघा सीमारेषेवरुन तिने मायदेशात प्रवेश केला. पोलिसांनी बंदोबस्तात तिला वाघा सीमेवर सोडून यावे, असा आदेश इस्लामाबाद न्यायालयाने दिला होता. २० वर्षीय उझमा मुळची नवी दिल्लीची आहे. ती या महिन्यातच पाकिस्तानला गेली होती. तिच्या म्हणण्यानुसार ताहिर अली नावाच्या व्यक्तीशी तिची मलेशियात भेट झाली होती. नंतर तो तिच्या प्रेमात पडला व ३ मे रोजी त्याने पाकिस्तानात तिच्याशी विवाह केला होता

ताहिरने बंदूकीच्या धाकाने माझ्यासोबत लग्न केले आहे. त्यामुळे त्याच्यापासून सुटका करुन मला भारतामध्ये परत जाण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती तिने केली. त्यानंतर तिने पती ताहिरविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये ताहिर अत्याचार करत असून तो धमकावत असल्याचा आरोप तिने केला होता. संबंधित प्रकरणात मोहसिन अख्तर कयानी यांच्या खंडपीठाने उझमाला भारतामध्ये जाण्याची परवानगी दिली. न्यायालयाच्या निकालानंतर ताहिरने उझमाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, उझमाने त्याला भेटण्यास नकार दिला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 11:55 am

Web Title: indian woman uzma returns to india via attari wagah border she was forced to marry a pakistani
Next Stories
1 ऊसाच्या हमीभावात प्रति टन अडीचशे रुपयांची वाढ
2 मथुरेत ‘कृष्ण’ कमी, ‘कंस’च जास्त- हेमा मालिनी
3 VIDEO: पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी; शेकडो लोक रस्त्यावर
Just Now!
X