News Flash

अमेरिकेतील भारतीय कामगारांचे भाषेचे आकलन कमी – लेपेज

भारतीय कामगार वाईट आहेत, त्यांचे भाषेचे आकलन कमी आहे

| April 25, 2016 12:04 am

भारतीय कामगार वाईट आहेत, त्यांचे भाषेचे आकलन कमी आहे, त्यांना कुठलीही गोष्ट सांगताना भाषांतर करून सांगत बसावे लागते, अशी टीका माइने प्रांताचे गव्हर्नर व रिपब्लिकन पक्षाचे सदस्य पॉल लेपेज यांनी केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारीच्या शर्यतीतील डोनाल्ड ट्रम्प यांनी काल इंडियन कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उच्चारांची नक्कल केली होती. माइने येथील रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात लेपेज यांनी सांगितले, की परदेशी कामगार स्थानिक हॉटेल्समध्ये काम करीत आहेत. बल्गेरिया व भारतातील कामगार येथे दिसतात, ते वाईट आहेत. भारतीयांशी बोलताना दुभाषाची गरज लागते. तरी शेवटी भारतीय लोक चांगले आहेत, असे सांगून त्यांनी सैल सुटलेली जीभ सावरण्याचा शेवटी प्रयत्न केला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काल भारत हा महान देश असताना तेथील बीपीओत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित उच्चार जमत नाहीत, असे सांगून नक्कल केली होती. ट्रम्प यांना माइने येथील अधिवेशनात फटका बसला असून तेथे १९ प्रतिनिधींनी क्रूझ यांना पाठिंबा दिला. लेपेज यांनी क्रूझ यांच्यावर टीका करताना सांगितले, की त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. क्रूझ यांच्याबरोबर राष्ट्रीय प्रचारात एकजुटीचा समझोता झाला होता पण क्रूझ यांनी तो तोडला, त्यांचे राजकीय संचालक डेव्हीड सॉयर यांनी हे कृत्य करून मायनेतील लोकांचा विश्वासघात केला. क्रूझ यांना काल ६५ प्रतिनिधी मते मिळाली. ट्रम्प ८४५ व क्रूझ ५५९ अशी स्थिती आहे. उमेदवारीसाठी १२३७ प्रतिनिधी मतांची गरज रिपब्लिकन उमेदवारांना आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 12:04 am

Web Title: indian workers worst to understand us state governor
Next Stories
1 हक्कानी नेटवर्कविरुद्ध कारवाईची अमेरिकेची पाकला सूचना
2 बांगलादेशातील प्राध्यापकाच्या खूनप्रकरणी एक ताब्यात
3 इक्वेडोरच्या भूकंपातील बळींची संख्या ६५४ वर
Just Now!
X