किडलेले दात हे अंतराळवीर होण्याच्या स्वप्नाच्या आड येऊ शकतात का? तर हो नक्कीच येऊ शकतात. कारण दात किडल्याने अनेकांचं अंतराळवीर होण्याचं स्वप्न भंगलं आहे. इन्स्टिट्युट ऑफ एअरोस्पेस मेडिसिनला नवा धडा मिळाला आहे आहे. १२ टेस्ट पायलट्सच्या भरतीदरम्यान ही गोष्ट IAM ला शिकण्यास मिळाली आहे. रशियातील तज्ज्ञांच्या मदतीने गेल्या ४५ दिवसांमध्ये रशियातील युरी गागारीन कॉस्मो ट्रेनिंग सेंटरमध्ये अंतराळवीरांसाठी एक प्रशिक्षण शिबीर पार पडलं. आता रशियात प्रशिक्षणासाठी गेलेला हा चमू लवकरच परतणार आहे.

गगनयान या मोहिमेसाठी अंतराळवीर निवडण्यासाठी एकूण ६० जण पात्र ठरले होते. त्यापैकी १२ जणांची निवड टेस्ट पायलट म्हणून करण्यात आली. मात्र ज्या ४८ जणांची निवड झाली नाही त्यापैकी अनेकांना दात किडल्याची, दात खराब असल्याची समस्या सतावत होती. निव्वळ या एका कारणामुळे त्यांचं अंतराळवीर होण्याचं स्वप्न भंगलं.