वेगळ्या तेलंगणा राज्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आंदोलन करणाऱयांची आज अखेर स्वप्नपूर्ती झाली. देशातील २९ वे राज्य म्हणून तेलंगणाची सोमवारी निर्मिती झाली आणि राज्यातील लोकांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले. तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी शपथ घेतली. तेलंगणाचे राज्यपाल ई. एस. एल. नरसिंह यांनी राव यांच्या सह १२ जणांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विभाजनाच्या प्रकिये दरम्यान या राज्यात लावण्यात आलेली राष्ट्रपती राजवट आज हटविण्यात आली. राव यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा मुलगा के. टी. रामाराव आणि पुतण्या टी. हरिष राव यांचाही समावेश करण्यात आला आहे.
अन्यथा  : वेगळं व्हायचंय मला..! – गिरीश कुबेर 
विभाजनानंतरच्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू येत्या ८ जूनला शपथ घेणार आहेत. तोपर्यंत तिथे राष्ट्रपती राजवट कायम राहणार आहे.