भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) सुनावल्यानंतर भारतात सर्वच ठिकाणी जल्लोषाचे वातावरण आहे. तर न्यायालयाच्या या निर्णयानंतर अनेक दिग्गजांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारतासाठी हा ऐतिहासीक विजय आहे यात शंका नाही. आंरराष्ट्रीय न्यायालयाने जे कॉन्सीलर अॅक्सीसबाबत म्हटले  त्याचे स्वागत आहे. असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

भारताचा मोठा विजय – सुषमा स्वराज, माजी केंद्रीय मंत्री
आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निर्णय हा भारताचा मोठा विजय आहे. यासाठी मी पंतप्रधान मोदींचे व आयसीजेमध्ये प्रभावीपणे व यशस्वीरित्या भारताची बाजू मांडणाऱ्या अॅड. हरिश साळवे यांचे आभार व्यक्त करते. मला अपेक्षा आहे की, या निर्णयामुळे कुलभूषण यांच्या कुटूंबीयांना धीर मिळेल.

पंतप्रधान मोदींच्या कुटनीतीला यश – गिरीराज सिंह, केंद्रीय मंत्री
या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची कुटनीती यशस्वी ठरली आहे. संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचा दहशतावादी चेहरा उघड झाला आहे. जगातील सर्वोच्च न्यायालयाने कुलभूषण जाधव प्रकरणातील सत्यता जाणली. पाकिस्तानच्या या दुटप्पी वागणुकीमुळेच त्यांना अभिनंदनला परत पाठवावे लागले होते. यामुळेच आज हाफिज सईदला अटक करावी लागली.