21 September 2020

News Flash

फुटिरतावादी नेत्यांना निमंत्रण; पाकिस्तान दिनाच्या कार्यक्रमावर भारताकडून बहिष्कार

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पाककडून जम्मू-काश्मीरधील फुटिरतावादी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पाककडून जम्मू-काश्मीरधील फुटिरतावादी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पाकच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या दुतावासामध्ये साजऱ्या होणाऱ्या या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त नवी दिल्लीत २३ मार्च रोजी संध्याकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमाला भारताचा एकही प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी दिली.

रविशकुमार म्हणाले, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी देशांदरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. मात्र, तरीही पाकिस्तानने काश्मीर खोऱ्यातील फुटिरतावादी आणि हुर्रियत नेत्यांना निमंत्रण दिले आहे. याचा भारताने तीव्र विरोध केला असून त्यासाठी भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला आपला प्रतिनिधी हजेरी लावणार नाही.

काश्मीर खोऱ्यातील फुटिरतावादी नेत्यांनी नेहमीच पाकिस्तानची बाजू घेतली आहे. तसेच इथल्या जनतेला धर्माच्या आणि स्वातंत्र्याच्या नावाने भारताविरोधात भडकावण्याचे काम करीत असतात. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी या फुटिरतावाद्यांकडून पैसाही पुरवण्यात येतो. त्यामुळे अशा लोकांना पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या निमंत्रणाचा भारताने विरोध केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 4:38 pm

Web Title: indias boycott on pakistan national day program at new delhi pakistans high commission
Next Stories
1 भाजपा नेत्यांना 1800 कोटींचं लक्ष्मीदर्शन, येडियुरप्पा यांनी फेटाळला काँग्रेसचा आरोप
2 ‘भारत बॉम्ब हल्ला करुन दहशतवाद्यांना संपवेल या भितीने सरकारने दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं’
3 होय तुमचा पासवर्ड आम्हाला ठाऊक आहे, फेसबुकची धक्कादायक कबुली
Just Now!
X