News Flash

भारतातील करोनाबाधितांचा ८८ लाखांचा टप्पा पार

गेल्या चोवीस तासात ४१,००० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले

देशात गेल्या चोवीस तासात ४१,००० नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येने ८८ लाखांचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या ८८,१४,५७९ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली.

गेल्या चोवीस तासांत देशात एकूण ४४७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशात आजवर १,२९,६३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात सध्या ४,७९,२१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये गेल्या चोवीस तासांत १,५०३ रुग्णांची घट नोंदवली गेली आहे. गेल्या चोवीस तासांत ४२,१५६ रुग्णांना पूर्णपणे बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर ८२,०५,६०७ रुग्ण बरे झाले आहेत.

करोनाबाधितांची सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्रात सध्या ८५,०४५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर आजवर १६,०९,६०७ रुग्ण बरे झाले असून ४५,८०९ मृत्यू झाला आहे. त्यानंतर कर्नाटकमध्ये सध्या २८,०४५ अॅक्टिव्ह रुग्ण असून ८,१८,३९२ रुग्ण बरे झाले असून ११,४९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तर देशाची राजधानी दिल्लीत सध्या ४४,३२९ अॅक्टिव्ह रुग्ण असून ७,४२३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४,२३,०७८ रुग्ण आजपर्यंत बरे झाले आहेत. त्यानंतर केरळमध्ये सध्या ७७,५०८ अॅक्टिव्ह रुग्ण असून ४,३४,७३० रुग्ण बरे झाले आहेत. तर १,८२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) माहितीनुसार, देशात १४ नोव्हेंबरपर्यंत एकूण १२,४८,३६,८१९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून यांपैकी गेल्या चोवीस तासात ८,०५,५८९ नमुने तपासण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 12:14 pm

Web Title: indias covid 19 tally crosses 88 lakh mark aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुढची १० ते २० वर्षे मोदींना पर्याय नाही, बाबा रामदेव यांचं वक्तव्य
2 राजधानी दिल्लीत प्रदुषणाची स्थिती गंभीर, बंदी असूनही फोडण्यात आले फटाके
3 हजारो ट्रम्प समर्थक वॉशिंग्टन डीसीत एकत्र; राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालाचा केला निषेध
Just Now!
X