News Flash

भारतानं ओलांडला करोनाबाधितांच्या मृत्यूचा एक लाखांचा टप्पा

एकूण करोनाबाधितांची संख्या पोहोचली ६४ लाखांवर

भारतानं शनिवारी करोनाबाधितांच्या मृत्यूंचा एक लाखांचा टप्पा ओलांडला. तसेच एकूण करोनाबाधितांची संख्या ६४ लाखांवर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली.

देशात पहिला करोनाबाधितांचा रुग्ण सापडला त्यानंतर आज २०४ दिवसांनंतरही रुग्ण संख्या वाढतच आहे. ७६ वर्षीय व्यक्तीचा १३ मार्च रोजी देशात करोनाच्या संसर्गानं पहिल्यांदा मृत्यू झाला होता. त्यानंतर या सहा महिन्यांच्या काळात करोना संसर्गामुळे मृतांची संख्या १,००,८४२ वर पोहोचली.

करोनाबाधितांच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या चोवीस तासात ७९,४७६ नवे रुग्ण आढळून आले असून १,०६९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६४,७३,५४४वर पोहोचली आहे. तर १,००,८४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच दिवशी महिन्याभरापूर्वी भारतात एकूण ६७,३७६ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

देशातील एकूण करोनाबाधितांपैकी सध्या ९,४४,९९६ रुग्ण सध्या अॅक्टिव्ह आहेत. तर ५४,२७,७०६ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे भारताचे प्रमाण हे चांगले असून ते ८३.८४ टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत असून ते सध्या १.५६ टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी दिली आहे.

दरम्यान, देशात सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या महाराष्ट्रात अद्यापही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत असून राज्यातील करोनाबाधिता रुग्णांची एकूण संख्या १४,१६,५१३वर पोहोचली आहे. तर आजवर ३७,४८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांचा क्रमांक लागतो. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात शुक्रवारी ११,३२,६७५ करोनाच्या नमुन्यांची चाचणी झाली. तर आजवर ७,७८,५०,४०३ इतक्या चाचण्या पार पडल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 11:33 am

Web Title: indias covid toll surpasses one lakh tally over 64 lakh aau 85
Next Stories
1 “मला कोणीच अडवू शकत नाही”, राहुल गांधींचा पीडितेच्या कुटंबाला भेटण्याचा निर्धार
2 मोठी बातमी! दोन कोटींपर्यंतच्या कर्जावरील चक्रवाढ व्याज रद्द करु, केंद्राची सुप्रीम कोर्टाला माहिती
3 अटल बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; लष्कराला सहज पोचता येणार चीन-पाकिस्तान सीमेवर
Just Now!
X