24 September 2020

News Flash

मोठी बातमी… पहिल्यांदाच एका दिवसातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे

४१ हजारांपेक्षा जास्त करोनाबळी

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

भारतात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. दरदिवशी ५०-५५ हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे, देशात आतापर्यंत १३ लाखा ७८ हजार १०६ जणांनी करोनावर मात केली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात सहा लाख ७ हजार ३८४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशात ४१ हजार ५८५ जणांचा बळी गेला आहे.

जगात ज्या देशांमध्ये करोनाचे रुग्ण आहेत त्यात भारताचा क्रमांक तिसरा आहे. अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त, ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त तर भारतात २० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. रशियात ८ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर दक्षिण अफ्रिकेतल्या रुग्णांची संख्या ५ लाखांच्या पुढे आहे. मेक्सिकोमध्ये ४ लाखांच्या पुढे रुग्णसंख्या आहे. पेरुमध्येही चार लाखांपेक्षा जास्त रुग्ण संख्या आहे. जगातल्या २०० पेक्षा जास्त देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 10:20 am

Web Title: indias covid19 case tally crosses 20 lakh mark with highest single day spike of 62538 case nck 90
Next Stories
1 ईडीच्या चौकशीपूर्वी रियाने वकिलांद्वारे केली ‘ही’ मागणी
2 करोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या पार पण…; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
3 भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकची गळफास घेऊन आत्महत्या
Just Now!
X