गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. मागील चोवीस तासांत देशात ९७ हजार ८९४ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात तब्बल १ हजार १३२ जणांना करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, यानंतर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५१ लाखांच्या पार गेली आहे.
मागील चोवीस तासांमध्ये देशात ९७ हजार ८९४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून १ हजार १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ५१ लाख १८ हजार २५४ इतकी झाली आहे. तर देशात सध्या १० लाख ९ हजार ९७६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ४० लाख २५ हजार ०८० जणांनी करोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत ८३ हजार १९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
India’s #COVID19 case tally crosses 51-lakh mark with a spike of 97,894 new cases & 1,132 deaths in last 24 hours.
The total case tally stands at 51,18,254 including 10,09,976 active cases, 40,25,080 cured/discharged/migrated & 83,198 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/s9bfUq9Jjn
— ANI (@ANI) September 17, 2020
6,05,65,728 samples tested up to 16th September for #COVID19. Of these, 11,36,613 samples tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR)
— ANI (@ANI) September 17, 2020
सध्या देशात करोनाच्या चाचण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. बुधवारी देशात तब्बल ११ लाख ३६ हजार ६१३ जणांची करोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत देशात ६ कोटी ५ लाख ६५ हजार ७२८ जणांची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 17, 2020 9:53 am