26 October 2020

News Flash

चोवीस तासांत देशात ७५,०८३ रुग्णांची नोंद; करोनाबाधितांच्या संख्येनं ओलांडला ५५ लाखांचा टप्पा

मागील चोवीस तासांत देशभरात १ हजार ५३ रुग्णांचा मृत्यू

(प्रतिकात्मक छायाचित्र)

देशातील करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. देशभरातील करोनाबाधितांच्या संख्येने आता ५५ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात ७५ हजार ८३ नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या ५५ लाख ६२ हजार ६६४ वर पोहचली आहे. आरोग्यमंत्रालयच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

देशातील एकूण ५५ लाख ६२ हजार ६६४ करोनाबाधितांमध्ये ९ लाख ७५ हजार ८६१ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले ४४ लाख ९७ हजार ८६८ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ८८ हजार ९३५ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

जगातील इतर देशांच्या तुलनेत करोनाच्या संसर्गात भारत वेगाने पुढे जात असल्याने निर्माण झालेली चिंतेच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांत ९०,००० रुग्ण बरे झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या सलग तीन दिवसांच्या आकडेवारीमुळं भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 10:33 am

Web Title: indias covid19 case tally crosses 55 lakh mark msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 अयोध्या : राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मालमत्तांच्या किंमतीत दुपटीनं वाढ
2 आंदोलक खासदारांना स्वतः चहा दिल्याबद्दल उपसभापती हरिवंश यांचे मोदींकडून कौतुक, म्हणाले…
3 राज्यसभेतील गोंधळामुळे उपसभापती हरिवंश यांचा एकदिवसीय उपोषणाचा निर्णय
Just Now!
X