27 October 2020

News Flash

देशातील करोनाबाधितांची संख्या ५६ लाखांहून अधिक, २४ तासांत ८३ हजार ३४७ नवे रुग्ण

मागील २४ तासांत १ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने अद्यापही वाढतच आहे. देशभरातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने ५६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात ८३ हजार ३४७ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, १ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर करोनाबाधितांची एकूण संख्या ५६ लाख ४६ हजार ११ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण ५६ लाख ४६ हजार ११ करोनाबाधितांमध्ये ९ लाख ६८ हजार ३७७ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले ४५ लाख ८७ हजार ६१४ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ९० हजार २० जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

२२ सप्टेंबरपर्यंत देशभरात ६,६२,७९,४६२ नमूने तपासणी झाली तर, ९ लाख ५३ हजार ६८३ नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

ब्रिटनमध्ये करोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची चिन्ह दिसत असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. करोना व्हायरसची दुसरी लाट रोखण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लोकांना ‘शक्य असेल तर घरातूनच काम करा’ असे आवाहन केले आहे तसेच बार आणि हॉटेल्स लवकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 10:35 am

Web Title: indias covid19 case tally crosses 56 lakh mark msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 ड्रग्ज प्रकरणात आता फक्त ट्रम्प यांचं नाव येणं बाकी : संजय राऊत
2 महाराष्ट्राला बदनाम करण्याचं सुनियोजित षडयंत्र रचलं जातंय : संजय राऊत
3 “वेगळं होण्याची वेळ आली”; टाटा सन्समधून शापूरजी पालनजी समूह बाहेर पडण्याच्या मार्गावर
Just Now!
X