देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप वाढतच आहे. देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ६६ लाखांचा टप्पा देखील ओलाडंला आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात ७४ हजार ४४२ नवे करोनाबाधित आढळले. तर, ९०३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ६६ लाख २३ हजार ८१६ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण ६६ लाख २३ हजार ८१६ करोनाबाधितांमध्ये ९ लाख ३४ हजार ४२७ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ५५ लाख ८६ हजार ७०४ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख २ हजार ६८५ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

भारतच नाही तर संपूर्ण जगाला करोना संकटाचा विळखा बसला आहे. करोनावरची लस नेमकी कधी येणार याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती देशाचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल दिली. सरकारकडून जुलै २०२१ पर्यंत देशातील २५ कोटी जनतेला करोनाची लस दिली जाऊ शकते असं त्यांनी म्हटलं आहे. संडे संवाद या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले “जुलै २०२१ पर्यंत २५ कोटी लोकांना लस देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. सरकारडे ४०० ते ५०० कोटी डोस उपलब्ध होती. त्यातील २५ कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण होईल” हा अंदाज हर्षवर्धन यांनी वर्तवला आहे.