News Flash

झाकीर नाईकचे प्रत्यार्पण करा, भारताची मलेशियाकडे मागणी

नाईक लवकरच भारताच्या ताब्यात येणार

Zakir Naik: वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक. (संग्रहित छायाचित्र)

भारत सरकारने मलेशियाला वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. नाईकवर युवकांना जिहादच्या नावावर भडकवल्याचा आरोप आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मलेशियाकडे नाईकच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार एनआयएने नाईकविरोधात पुरावे गोळा करण्यापासून ते आरोपपत्र दाखल करण्यापर्यंतची सर्व औपचारिकता पूर्ण केली आहे. भारताच्या या मागणीवर आता कौलालंपूर न्यायालयाला निकाल द्यायचा आहे.

झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणास मलेशियाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, मलेशियाचे उपपंतप्रधान अहमद जाहीद यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये भारत सरकारने म्युच्युअल लीगल असिस्टंस ट्रीटी (एमएलएटी)अंतर्गत मलेशिया सरकारला अधिकृतरित्या अर्ज केल्यास नाईकचे प्रत्यार्पण करण्यात येईल, असे म्हटले होते.

झाकीर नाईक अनेक दिवसांपासून जाणूनबुजून हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लीममधील शिया, सुफी आणि बरेलवी समाजाचा अपमान करत आहे. नाईकच्या भाषणामुळे युवक आयसिससारख्या दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यास प्रेरित होत असल्याचा दावा एनआयएने २६ ऑक्टोबर २०१७ मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात केला होता.

मलेशियाच्या न्यायालयाला नाईकच्या भाषणांची सीडी, डीव्हीडी देण्यात येईल. एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, झाकीर नाईकने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन ही एनजीओ आणि हार्मोनी मीडिया प्रा. लि. च्या माध्यमाचा देशविरोधी कृत्यासाठी वापर केल्याचे पुरावे आहेत. नाईकच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, अशी आशा असल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2018 8:39 pm

Web Title: indias demand to malaysia for the extradition of zakir naik
Next Stories
1 CBSE पेपर लीक प्रकरणात अभाविपच्या नेत्याचा हात, काँग्रेसचा आरोप
2 ‘भाजपाचे दलितांवरील अत्याचाराकडे दुर्लक्ष पण बाबासाहेबांचे नाव बदलण्यात रस’
3 चीनची घुसखोरी रोखण्यासाठी भारताने अरुणाचल सीमेवर वाढवल्या सैन्य तुकडया
Just Now!
X