स्वदेशी बनावटीची पहिली पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘आयएनएस कमोर्ता’ बांधून तयार झाली असून पुढील महिन्यात तिचा नौदलात समावेश होत आहे.
येथील ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीयर्स’मध्ये (जीआरएसई) आयएनएस कमोर्ताची बांधणी झाली आहे. जीआरएसईच्या नौकाबांधणी गोदीत कमोर्ताची बांधणी पूर्ण झाली असून पुढील महिन्यात ती नौदलाच्या पूर्व ताफ्यात विशाखापट्टणम येथे समाविष्ट होईल. पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्र डागता येणारे स्वदेशी बनावटीचे रॉकेट लाँचर कमोर्तावर बसविण्यात आले असून शत्रूच्या रडारच्या नजरेत येणार नाही अशा पद्धतीने (स्टील्थ) तिची बांधणी करण्यात आली आहे. तिचा कमाल वेग २५ सागरी मैल प्रतितास असून १८ सागरी मैल प्रतितास या सरासरी वेगाने ती सलग ३५०० सागरी मैल अंतर कापू शकते. १०९ मीटर लांब आणि १३ मीटर रुंदीच्या या नौकेची सुमारे ९० टक्के बांधणी स्वदेशी आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 25, 2014 12:34 pm