News Flash

भारतात करोना व्हायरसमुळे चौथा मृत्यू

छातीत दुखत असल्यामुळे या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

संग्रहित छायाचित्र

भारतात करोना व्हायरसमुळे चौथा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील एका ७० वर्षीय व्यक्तीचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती इटलीमार्गे जर्मनीहून भारतात आली होती. छातीत दुखत असल्यामुळे या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला.

या रुग्णाचा करोना व्हायरसच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंजाबच्या होशियारपूरमधील बांगा येथील रुग्णालयात या व्यक्तीचे निधन झाले.

या व्यक्तीच्या गावापासूनचा तीन किमीपर्यंतचा परिसर बंद करण्यात आला आहे. या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. याआधी करोनामुळे तीन मृत्यू झाले आहेत. त्यात मुंबईतील एका रुग्णाचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 5:50 pm

Web Title: indias fourth coronavirus death reported from punjab dmp 82
Next Stories
1 Coronavirus: परदेशात लागण झालेल्या भारतीयांना मायदेशी परत आणणार का? केंद्र सरकारने केलं स्पष्ट
2 रंजन गोगोईंनी खासदारकीची शपथ घेताच काँग्रेस आणि बसपाने दिल्या ‘शेम शेम’ च्या घोषणा
3 रामदेव बाबा यांचे आता तंत्रज्ञान क्षेत्रात पाऊल; स्थापन केली नवी स्टार्टअप कंपनी
Just Now!
X