25 February 2021

News Flash

भारताचा शेजारील देशांना मदतीचा हात; भूटान, मालदिवला पाठवली करोनाची लस

भेट स्वरुपात पाठवली लस

उत्कृष्ट नियोजनाद्वारे करोनाच्या संकटावर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतानं नियंत्रण मिळवलं आहे. या आजारावरील लस निर्मिती प्रक्रियेतही भारत आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे अवघं जग भारताकडं आशेने पाहत आहे. जागतिक स्तरावरील आपली जबाबदारी ओळखून भारतही कौतुकास्पद पावलं टाकत आहे. नुकताचं भारतानं भूटान आणि मालदीव या आपल्या सख्या शेजारी देशांना भेट स्वरुपात करोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला आहे.

एएनआयच्या माहितीनुसार, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन भूटानची राजधानी थिंफूकडे सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोविशिल्ड लसीचे १.५ लाख डोस पाठवण्यात आले आहेत. तसेच मालदीवची राजधानी माले येथे मुंबईतून कोविशिल्डचे १ लाख डोस पाठवण्यात येणार आहेत.

भारत हा जगातील लस निर्मिती उद्योगातील एक प्रमुख देश म्हणून ओळखला जातो. आजवर भारतानं जगातील अनेक देशांना विविध आजारांवरील औषधे तसेच लसींचा पुरवठा केला आहे. करोनाच्या या संकट काळात सध्या भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरु आहे. दरम्यान, भारतातील कंपन्यांना जगातील अनेक देशांनी लस पुरवठ्यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे. दरम्यान, भूटान आणि मालदीव या शेजारील देशांना भारतानं भेट स्वरुपात लस पाठवली आहे.

भारत सरकारकडून सीरमच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना आपत्ककालिन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 10:26 am

Web Title: indias helping hand to neighboring countries corona vaccine sent to bhutan maldives from mumbai aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘या’ दोन देशांपासून भारताने सावध रहावे; जाता जाता ट्रम्प प्रशासनाचा मैत्रीपूर्ण सल्ला
2 प्रजासत्ताक दिनी राजपथावर घडणार महाराष्ट्राच्या संत परंपरेचं दर्शन
3 भाजपानं शहरांनंतर आता फळांकडे वळवला ‘नामांतर’ मोर्चा; गुजरात सरकारनं केलं ड्रॅगन फ्रूटचं बारसं
Just Now!
X