भारताने जी-सॅट १५ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. फ्रेंच गयाना येथील कौराऊ अवकाश स्थानकावरुन हे प्रक्षेपण करण्यात आले.
आज पहाटे ३ वा ४ मिनिटांनी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारताच्या या उपग्रहासोबत सौदी अरेबियाचा ‘अरबसॅट-६बी‘चेही प्रक्षेपण करण्यात आले. ‘एरिन-५ व्हीए-२२७‘ या प्रक्षेपकामार्फत या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. ‘जीसॅट-१५‘चे वजन ३१६४ किलो असून, त्यावर २४ केयू बॅंड ट्रान्सपॉंडर आहेत; तसेच त्यावर ‘गगन‘ ही दिशादर्शक यंत्रणाही असणार आहे. आपातकालीन सेवांसाठी या उपगृहाचा वापर करण्यात येणार आहे. यापुर्वी जी-सॅट-८ आणि जी-सॅट १० या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी याबाबतची माहिती दिली आहे.