भारताच्या महत्वाकांक्षी मंगळ मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून आज रविवार सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी अवकाशयानाच्या प्रक्षेपणासाठी ५६ तास आणि ३० मिनिटांचे काउंटडाऊन सुरू झाले आहे.
मंगळग्रहावरील भारताच्या मोहीमेचे मंगळवारीच प्रस्थान होणार आहे. त्याच दिवशी दिवाळीतील भाऊबिजेचा सण आहे. त्यामुळे या दिवाळीत भारताची ही मोहिम यशस्वी होऊन भारताला मंगळ मोहिमेचे ‘दिवाळी गिफ्ट’ मिळेल अशी आशा आहे.
पीएसएलव्ही-एक्सएल या प्रक्षेपकाद्वारे १३३७ किलोग्रॅमचा उपग्रह मंगळाच्या कक्षेत सोडण्यात येणार आहे. भारताच्या मंगळ मोहीमेचे शास्त्रीय नाव मार्स ऑर्बिटर मिशन (एमओएम) असे आहे.