News Flash

इस्त्रो पुन्हा घेणार चंद्रभरारी… जाणून घ्या या आगामी मोहिमेबद्दल

जाणून घ्या जपानच्या सोबतीनं आखलेल्या इस्त्रोच्या पुढील चंद्र मोहिमेबद्दल

ISRO JAXA MISSION

चांद्रयान-२ मोहिमेतील संपर्क तुटलेले ‘विक्रम लँडर’ चंद्राच्या पृष्ठभागावर आढळले असून त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) शास्त्रज्ञ करीत आहेत. लँडर चांद्रभूमीपासून अवघ्या २.१ कि.मी.वर असताना त्याचा ‘इस्रो’चे मुख्यालय आणि पृथ्वीवरील भूकेंद्रांशी असलेला संपर्क तुटला. एकीकडे लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न पुढील १४ दिवसांमध्ये केला जाणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी दिली आहे. एकीकडे चांद्रयान-२ मोहिमेतील लँडरची संपर्काचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे इस्त्रो आता पुढच्या चंद्र मोहिमेसाठी तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. इस्त्रोचे ही नवीन चंद्र मोहिम चांद्रयान-२ मोहिमेपेक्षा अधिक अत्याधुनिक असणार आहे. या मोहिमेमध्ये चंद्राच्या ध्रुवीय भागावरील मातीचे नमुने गोळा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जपान आणि भारताची अवकाश संशोधन संस्था संयुक्तरित्या ही मोहिम राबवणार आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो आणि जपानची अवकाश संशोधन संस्था ‘जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ (जेएएक्सए) एकत्रपणे या मोहिमेत काम करणार आहेत. इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘इस्त्रो आणि जाक्साचे वैज्ञानिक चंद्राच्या ध्रुवीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित मोहिम राबवण्याचा विचार करत आहेत.’

२०१७ ला झाली होती चर्चा

२०२४ मध्ये इस्त्रो आणि जाक्सा या मोहिमेवर काम सुरु करणार आहेत. याआधी भारत २०२२ ला गगनयान मोहिम पूर्ण करणार आहे. या मोहिमेमध्ये इस्त्रो भारताचा पहिला अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहे. या संयुक्त मोहिमेची चर्चा पहिल्यांदा २०१७ साली झाली होती. बंगळुरुमध्ये झालेल्या दोन्ही देशांच्या अवकाश संशोधन संस्थांच्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली होती. तसेच २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर गेले होते त्यावेळेसही या मोहिमेसंदर्भात चर्चा झाली होती.

जपानने हायाबुसा-२ मोहिम केली फत्ते

याच वर्षी जपानच्या ‘जाक्सा’ने एका बटुग्रहावर यशस्वीपणे हायाबुसा-२ हे यान उतरवले. या मोहिमेच्या माध्यमातून जपानने अंतराळ क्षेत्रातील आपले तांत्रिक वर्चस्व सिद्ध केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 8:59 am

Web Title: indias next moon shot will be bigger in pact with japan scsg 91
Next Stories
1 काश्मीरमधील स्थिती, एनआरसी याबाबत संघाच्या बैठकीत चर्चा
2 विक्रम लँडर सापडले..
3 आव्हाने स्वीकारत सरकारची निर्धारपूर्वक वाटचाल : मोदी
Just Now!
X