भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून ती १३६ कोटींवर पोहोचली आहे. २०१० ते २०१९ या काळात १.२ टक्के वार्षिक दराने ही वाढ झाली आहे. चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ निम्म्याने जास्त आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

२०१९ मध्ये भारताची लोकसंख्या १३६ कोटींवर पोहोचली आहे. १९९४ मध्ये ती ९४.२२ कोटी इतकी होती. तत्पूर्वी १९६९ मध्ये ती ५४.१५ कोटी इतकी होती. जगाच्या लोकसंख्येत वाढ होऊन २०१९ मध्ये ती ७७१.५ कोटी इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ही आकडेवारी ७६३.३ कोटी होती. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, २०१० आणि २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येत १.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच्या तुलनेत चीनची लोकसंख्या २०१९ मध्ये १४२ कोटींवर पोहोचली आहे. ही १९९४ मध्ये १२३ कोटी तर १९६९ मध्ये ८०.३६ कोटी इतकी होती. या अहवालानुसार, भारतात १९६९ मध्ये प्रतिमहिना एकूण जन्मदर ५.६ टक्के इतका होता. तो १९९४ मध्ये ३.७ टक्के राहिला. मात्र, भारताने जन्मावेळच्या सरासरी आयुर्मानात सुधारणा नोंदवली आहे.

demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
According to the United Nations Population Fund UNFPA report the estimated population of India is 144 crores
भारताची लोकसंख्या १४४ कोटी, माता मृत्युदरात घट
Congress election manifesto published Caste wise census
जातनिहाय जनगणना, आरक्षण मर्यादावाढ; काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी उपेक्षित, महिला 
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या

१९६९ मध्ये जन्माबरोबरच सरासरी आयुर्मान हे ४७ वर्ष होते. १९९४ मध्ये ६० वर्ष झाले त्यानंतर २०१९ मध्ये ते ६९ वर्ष झाले. जगाच्या आयुर्मानाचा सरासरी दर ७२ वर्ष आहे. अहवालात २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या आकडेवारीचा एक आलेख दिला आहे. यामध्ये म्हटले आहे की, देशाची २७-२७ टक्के लोकसंख्येचे आयुर्मान हे ० ते १४ आणि १०-२४ वर्ष इतके आहे. तर देशाची ६७ टक्के लोकसंख्या १५-६४ या वयोगटातील आहे.

देशाची ६ टक्के लोकसंख्या ६५ वर्ष वयाची आणि त्यापेक्षा अधिक वयाची आहे. भारताच्या आरोग्य सुविधा प्रणालीच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. देशात माता मृत्यूदर १९९४ मध्ये एक लाखांमागे ४८८ इतका होता. त्यात घट होऊन २०१५ मध्ये हा दर प्रती लाख १७४ मृत्यू इतपर्यंत खाली आला. मात्र, युएनएफपीएचे संचालक जेनेवा मोनिका फेरो यांनी ही आकडेवारी चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. हा दर आणखी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करताना महिलांचे मृत्यू थांबवण्यासाठी गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवांमध्ये वाढ होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.