17 January 2021

News Flash

देशात २०,९१७ रुग्ण करोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३१.१५ टक्के

मागच्या २४ तासात सोमवार सकाळपर्यंत देशभरात करोनाचे ४,२१३ नवे रुग्ण सापडले.

(संग्रहित छायाचित्र)

भारतात Covid-19 ची लागण झालेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ३१.१५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. संपूर्ण देशभरात २०,९१७ रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. मागच्या २४ तासात १,५५९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मागच्या २४ तासात सोमवार सकाळपर्यंत देशभरात करोनाचे नवे ४,२१३ रुग्ण सापडले व ९७ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात आता करोना व्हायरसचे ६७,१५२ रुग्ण असून २,२०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी रुग्णांमध्ये लक्षणे असतील तर त्यांना स्वत:हून समोर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 5:57 pm

Web Title: indias recovery rate now at 31 15 20917 people cured of covid 19 dmp 82
टॅग Coronavirus
Next Stories
1 देशभरात ४ हजार १२३ नवे करोना रुग्ण, संख्या ६७ हजारांच्याही वर
2 पाच लाख स्थलांतरित मजूर 468 विशेष रेल्वेंद्वारे मूळ राज्यात परतले
3 धक्कादायक, चीनच्या प्रसिद्ध स्टोअरमधील महिलेच्या हस्तमैथुनाचा व्हिडीओ झाला व्हायरल
Just Now!
X