News Flash

Coronavirus : देशभरात 24 तासांत 40 बळी, मृतांची संख्या 239 वर

तब्बल 1 हजार 035 नवे रुग्ण आढळले, एकुण आकडा 7 हजार 447 वर पोहचला

संग्रहित छायाचित्र

जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. अवघ्या चोवीस तासात देशभरात करोनाने 40 जणांचा जीव घेतला असून तब्बल 1 हजार 035 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.  याचबरोबर देशातील करोनाबाधितांचा एकुण आकडा  7 हजार 447 वर पोहचला आहे.

देशभरातील एकुण 7 हजार 447 करोनाबाधित रुग्णांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले 6 हजार 565 रुग्ण, ज्यांना रुग्णालयातील उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे व विलिगीकरणात ठेवले आहेत असे 239 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 239 जणांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.

जगातील करोनाबळींच्या संख्येने शुक्रवारी एक लाखाचा आकडा ओलांडला. दरम्यान, जगात महामंदी येणार असल्याचा इशारा जागतिक नाणेनिधीने दिला असून, 17 कोटी अमेरिकींनी नोकऱ्या गमावल्याची आकडेवारी जाहीर झाल्यामुळे करोनामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक आपत्तीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 9:04 am

Web Title: indias total number of coronavirus positive cases rises to 7447 msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महिंद्रा ‘स्वराज’ शेतकऱ्यांसाठी सरसावली, केली अतिरिक्त ट्रॅक्टरची सुविधा
2 “आम्हाला पगार द्या”, लॉकडाउन वाढण्याच्या भीतीने हजारो कामगार रस्त्यावर; दगडफेक आणि जाळपोळ करत हिंसाचार
3 संतापजनक! करोना विलगीकरण कक्षातील गर्भवती महिलेवर बलात्कार
Just Now!
X