जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. अवघ्या चोवीस तासात देशभरात करोनाने 40 जणांचा जीव घेतला असून तब्बल 1 हजार 035 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.  याचबरोबर देशातील करोनाबाधितांचा एकुण आकडा  7 हजार 447 वर पोहचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरातील एकुण 7 हजार 447 करोनाबाधित रुग्णांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले 6 हजार 565 रुग्ण, ज्यांना रुग्णालयातील उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे व विलिगीकरणात ठेवले आहेत असे 239 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 239 जणांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.

जगातील करोनाबळींच्या संख्येने शुक्रवारी एक लाखाचा आकडा ओलांडला. दरम्यान, जगात महामंदी येणार असल्याचा इशारा जागतिक नाणेनिधीने दिला असून, 17 कोटी अमेरिकींनी नोकऱ्या गमावल्याची आकडेवारी जाहीर झाल्यामुळे करोनामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक आपत्तीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias total number of coronavirus positive cases rises to 7447 msr
First published on: 11-04-2020 at 09:04 IST