29 November 2020

News Flash

दिलासादायक : देशात ५० लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी केली करोनावर मात

मागील २४ तासांत ७४ हजार ८९३ जण झाले बरे

प्रतिकात्मक छायाचित्र

देशात इकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी करोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात आजपर्यंत करोनातून बरे झालेल्यांच्या एकूण संख्येने ५० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांमध्ये ७४ हजार ८९३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. याचबरोबर देशभरात करोनावर मात करणाऱ्यांची संख्या आता ५० लाख १६ हजार ५२० वर पोहचली आहे. मागील काही दिवसांमध्ये भारतात करोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एक दिवसात ९० हजारापेक्षा अधिक रुग्ण करोनातून बरे झालेले दिसून आले आहे. भारत सरकारच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

आज सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार देशातील एकूण करोनाबाधितांच्या संख्ये ६० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. २४ तासांमध्ये ८२ हजार १७० नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६० लाख ७४ हजार ७०३ वर पोहचली आहे. यामध्ये ९ लाख ६२ हजार ६४० अॅक्टिव्ह केसेस, करोनातून बरे झालेले व डिस्चार्ज मिळालेले ५० लाख १६ हजार ५२१ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ९५ हजार ५४२ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

२७ सप्टेंबरपर्यंत देशात ७,१९,६७,२३० नमूने तपासण्यात आले असून, यातील ७ लाख ९ हजार ३९४ नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती ‘आयसीएमआर’ कडून मिळाली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाउनचे निर्बंध टप्प्या टप्प्यांमध्ये शिथिल केले जात आहे. सध्या सरकारने अनलॉक ४ अंतर्गत अनेक गोष्टींसाठी परवानगी देत अर्थव्यवस्थेचा चालना देण्यासंदर्भात काही निर्णय घेत उद्योग व्यवसाय सुरु करण्यास सूट दिली आहे. आज पुन्हा सरकारकडून अन्य काही निर्बंध शिथिल करत अनलॉक ५ अंतर्गत ३१ ऑक्टोबरपर्यंत नवीन नियम जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

करोनाच्या संकटामध्ये मागील सहा महिन्यांमध्ये आणि लॉकडाउनमुळे एप्रिल ते जून तिमाहीत देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नात (जीडीपीमध्ये) २३.९ टक्क्यांची घसरण झाली असतानाच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेसमोरील संकटं अजून कायम असल्याचे म्हटले आहे. अर्थव्यवस्थेसमोर सध्या अनेक आव्हानं आहेत. करोनाचे संकट कधी संपणार? खास करुन जोपर्यंत करोनावर लस सापडत नाही तोपर्यंत याबद्दल कोणीही ठोसपणे काही सांगू शकत नाही, असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 2:47 pm

Web Title: indias total recoveries have crossed the landmark milestone of 50 lakh msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 भारतातील लोकशाही मेलीये, हा घ्या पुरावा; कृषी कायद्यांवरून राहुल गांधी संतापले
2 अर्थमंत्री म्हणतात, “करोना कधी जाणार, लस कधी येणार ठाऊक नाही; अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने कायम राहणार”
3 स्पर्म डोनरमुळे जुळी मुलं, पाच वर्षांनी नवऱ्यानेही सोडलं, डोनरही मुलांना घेऊन पसार
Just Now!
X