बंगळुरुच्या हवाई हद्दीत इंडिगो एअरलाईन्सच्या दोन प्रवासी विमानांमध्ये होणारा अपघात थोडक्यात टळला आणि सुदैवाने ३३० प्रवाशांचे प्राण वाचले. मंगळवारी १० जुलै रोजी ही घटना घडली. विमान अपघात तपास बोर्डाने (एएआयबी) या घटनेची चौकशी सुरु केली आहे.

कोईमबतोर-हैदराबाद आणि बंगळुरु-कोचीन मार्गावरील ही दोन विमाने होती. इंडिगोच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला असून हैदराबादला जाणाऱ्या विमानामध्ये १६२ आणि दुसऱ्या विमानात १६६ प्रवासी होते.

दोन्ही विमानांमध्ये फक्त २०० फुटांचे अंतर राहिलेले असताना अपघाताची पूर्वकल्पना देणाऱ्या टीसीएएस यंत्रणेचा अर्लाम वाजल्याने हा अपघात टळला.