अमेरिकन गुप्तचर संस्थेने (सीआयए) आपला गोपनीय अहवाल सार्वजनिक केल्यापासून अनेक खळबळजनक खुलासे बाहेर येत आहेत. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सोव्हिएत संघाने काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षाला पैसे पुरवले होते, अशी नवी माहिती या अहवालातून बाहेर आली आहे. इंदिरा गांधींच्या काळात त्यांच्या ४० टक्के खासदारांना सोव्हियत संघाने पैसे दिले होते. २००५ साली रशियन गुप्तचर संस्था केजीबीच्या फुटलेल्या अहवालातूनही ही माहिती समोर आली होती. सीआयएने सोव्हिएत संघाच्या भारतावरील प्रभावाबद्दल डिसेंबर १९८५ मध्ये अहवाल तयार केला होता. सोव्हिएत संघ राजकीय दल आणि व्यक्तींना छुप्या पद्धतीने पैसे देऊन भारतीय राजकारणात महत्वाची भूमिका निभावत असल्याचे या अहवालात म्हटले होते. या अहवालानुसार इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळावेळी काँग्रेसच्या सुमारे ४० टक्के खासदारांना सोव्हिएत संघाकडून राजकीय देणगी मिळत होती. सोव्हिएत संघाच्या दुतावासातील अधिकारी काँग्रेसच्या नेत्यांना गुपचूपरित्या भेटून पेसे देण्यासाठी व इतर खर्चासाठी मोठी रक्कम राखून ठेवत.

यापूर्वी केजीबीचे माजी गुप्तहेर वासिली मित्रोकिन यांनी २००५ मध्ये लिहिलेल्या एका पुस्तकातही अशाच पद्धतीचा दावा केला होता. वासिली सोव्हिएत संघाचे हजारो गोपनीय दस्ताऐवज देशाबाहेर घेऊन गेले होते. काँग्रेस पक्षाला सुटकेस भरून पैसे दिले होते, असा दावा त्यांनी केला होता. तसेच केजीबीने १९७० च्या दशकात माजी संरक्षण मंत्री व्ही. के. मेनन यांच्याशिवाय इतर चार केंद्रीय मंत्र्यांच्या निवडणूक प्रचारासाठी निधी दिल्याचेही त्यांनी म्हटले होते.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार भारतीय उद्योगपतींशी समजोता करून काँग्रेस पक्षाला लाच देण्यात आली होती, असा आरोप सीआयएच्या अहवालात करण्यात आला आहे. सीपीआय आणि सीपीएमलाही सोव्हिएत संघाकडून निधी मिळत होता. सर्व राजकारण्यांना आर्थिक मदत देण्यात आली नव्हती, असेही या अहवालात म्हटले आहे. या अहवालात अशा एका व्यक्तींचे नाव आहे की ज्याने सोव्हिएत संघाशी कथितरित्या सौदे केले होते. यामध्ये इंदिरा गांधी यांना आव्हान देण्याची शक्यता असलेल्या नेत्याचेही नाव आहे.
केजीबीकडून निधी देण्यात येत असल्याने अनेक नेत्यांची सोव्हिएत संघापर्यंत पोहोच हाती. या माध्यमातून भारतीय राजकारणाला प्रभावित करण्यास त्यांना मदत मिळाली होती. यापूर्वी केजीबीच्या फुटलेल्या अहवालात भारतासारख्या तिसऱ्या जगातील सरकारमध्ये केजीबीच्या घुसखोरीचे मॉडेल मानले जात. सरकारमध्ये केजीबीशी संबंधित अनेक लोक होते.

Former Governor D Subbarao
आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “श्वेतपत्रिका…”
PM narendra Modi about changing Constitution India Bloc Rahul Gandhi loksabha election 2024
“स्वत: आंबेडकर आले, तरी घटना बदलू शकत नाही”; या निवडणुकीत राज्यघटनेच्या मुद्यावरून एवढा वादंग का होतोय?
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
sangli congress, congress leaders sangli latest marathi news
सांगलीत काँग्रेसचे भवितव्य काय ? विधानसभेत फटका बसण्याची नेत्यांना भीती