एका अनामिक करदात्याने सरकारचे तब्बल २१,८७० कोटी रुपये थकवले असल्याचे माहिती समोर आली आहे. ही रक्कम देशाच्या एकूण वैयक्तिक कराच्या रकमेच्या ११ टक्के आहे. भारतीय आयकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीचा अभ्यास इंडिया स्पेंड या संस्थेनी केला आहे. त्यातून  त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. २०१४-१५ या वर्षासाठीचा आयकर त्या व्यक्तीने भरला नाही. त्याच्याकडून सरकारला २१,८७० कोटी रुपये येणं बाकी आहे. तसेच तीन वैयक्तिक करदात्यांनी आपले उत्पन्न ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे जाहीर केले आहे. दोन करदात्यांनी २०१४-१५ सालासाठी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर आल्याचे जाहीर केले आहे. वरील पैकी कुणाचीही नावे आयकर विभागाने जाहीर केली नाहीत.

१ टक्के भारतीय अब्जाधिशांकडे देशातील जवळपास ५८ टक्के संपत्ती असल्याचे म्हटले आहे. तळागातील ७० टक्के लोकांजवळ जितकी संपत्ती आहे तेवढी संपत्ती देशातील केवळ ५७ अब्जाधिशांच्या हातात आहे असे ऑक्सफमने म्हटले आहे. २०१३-१४ या वर्षामध्ये भारतामध्ये एकूण ३.६ कोटी वैयक्तिक करदाते आहेत. त्यांनी घोषित केलेले एकूण उत्पन्न हे हे १६.५ लाख कोटी रुपये होते. या उत्पन्नावर १.९१ लाख कोटींचा कर होता. २०१४-१५ या वर्षासाठी वैयक्तिक करदात्यांची संख्या ३.६ कोटी इतकी होती. या करदात्यांचे एकूण उत्पन्न ९.८ लाख कोटी रुपये होते असे त्यांनी जाहीर केले. ही रक्कम भारताच्या एकूण उत्पन्नाच्या ७ टक्के आहे.

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप
Navi Mumbai Municipal Corporation, Achieves, Record Property Tax, Collection, 716 Crore , financial year, 2023-2024,
नवी मुंबईत ७१७ कोटी मालमत्ता कर जमा, गतवर्षीपेक्षा ८३.६६ कोटी जास्त करवसुलीचा दावा

२०१४-१५ वर्षासाठी सरकारला एकूण २.४ लाख कोटी रुपये वैयक्तिक कराच्या स्वरुपात येणार होते. याच रकमेच्या एकूण ११ टक्के रक्कम म्हणजेच २१,८७९ कोटी रुपये थकवले गेले आहेत. भारताच्या तुलनेत अमेरिकेमध्ये गरीब श्रीमंतांची दरी कमी आहे. अमेरिकेतील १ टक्के श्रीमंताकडे १९ टक्के लोकांकडे असेल इतकी संपत्ती आहे. तसेच या लोकांनी ३८ टक्के कराची रक्कम भरली होती. दिवसेंदिवस गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढत चालल्याचे ऑक्सफमने म्हटले आहे. प्रगत देशांपेक्षा प्रगतीशील देशांमध्ये हे प्रमाण अधिक असते. जगातील अर्ध्याधिक संपत्ती ही फक्त आठ व्यक्तींच्या हाती एकवटली आहे असेही म्हटले आहे. त्यात अमेरिकेतल्या ६ गर्भश्रीमंताचा आणि मेक्सिकोमधल्या एक आणि स्पेनमधल्या एका व्यवसायिकाचा समावेश असल्याचे म्हटले आहे. जगातील ५० टक्के गरीबांची संपत्ती एकत्र केली तर त्यापेक्षाही अधिक संपत्ती ही या आठ गर्भश्रींमतांकडे असल्याचे या अहवालात म्हटले आहे.