इंडोनेशियामध्ये शनिवारी रात्री त्सुनामीचा तडाखा बसला. यामध्ये आतापर्यंत 168 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री 9.30 वाजता त्सुनामीटा तडाखा बसला. ज्वालामुखी फुटल्यामुळे त्सुनामी आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामध्ये अनेक इमारती कोसळल्या असून समुद्रातून बऱ्याच बोटी देखील बेपत्ता झाल्यात.


ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं समुद्राच्या आत भूस्खलन झालं आणि लाटा मोठ्या प्रमाणात उसळल्या. त्यानंतर या लाटांनी सुनामीचं स्वरूप धारण केल्याचं सांगितलं जात आहे. समुद्रात 15 ते 20 फुट उंच लाटा उसळल्या होत्या असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. या त्सुनामीमध्ये आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 600हून अधिक लोक जखमी आहेत. बचावकार्य आणि शोधमोहिम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्सुनामीचा सर्वाधिक फटका पेनदेंगलेग, सेरांग, आणि दक्षिण लाम्पुंग परिसराला बसल्याची माहिती आहे.

यापूर्वी याचवर्षी सुलवेसू द्विपमध्ये आलेल्या त्सुनामीमुळे 800 हून जास्त जणांचा मृत्यू झाला होता. तर हजारो लोक बेपत्ता झाले होते. या त्सुनामीचा सर्वाधिक फटका पालू आणि दोंगला शहराला बसला होता. एकूण 6 लाख लोकसंख्या असलेल्या या दोन्ही शहरांमधील परिस्थिती तीन महिन्यांनंतरही सर्वसामान्य झालेली नाही.