05 June 2020

News Flash

इंदूर : लॉकडाऊन बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलवर दगडांनी हल्ला, ६ अटकेत

परिस्थिती नियंत्रणात, पोलिसांची कडक कारवाई

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. या काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यापासून थांबवण्यासाठी पोलिस यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या पथकावर हल्ला झाला होता. मंगळवारी संध्याकाळी सहा वाजल्याच्या दरम्यान लॉकडाऊन बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कॉन्सटेबलर दगडांनी हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. इंदूरमधील चंदन नगर परिसरात हा प्रकार घडला असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत ६ जणांना अटक केली आहे.

संध्याकाळी ६ वाजता चंदन नगर परिसरातील लोकं भाजी आणि फळं विकत घेण्यासाठी घराबाहेर पडली होती. यावेळी एका ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांनी गर्दी करु नये यासाठी पोलिस कॉन्सटेबल प्रयत्न करत होता. यावेळी स्थानिक लोकांनी या कॉन्स्टेबलवर दगडांनी हल्ला केला. या घटनेनंतर कॉन्सटेबलने पोलिस स्थानकातून अधिक मदत मागवली. ज्यानंतर परिस्थितीही नियंत्रणात आली. या घटनेचा व्हिडीओ व्हारयर झाल्यानंतर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या सहा जणांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक केली आहे.

दरम्यान संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं असलं तरीही प्रत्येक दिवशी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करानो बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. आतापर्यंत देशभरात १०० पेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. मध्य प्रदेशात इंदूर, भोपाळ यासारख्या शहरांमध्ये पोलिस, डॉक्टरांच्या पथकावर हल्ला होण्याचं प्रमाण वाढलं होतं. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेत कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 6:30 pm

Web Title: indore constable on lockdown duty attacked with stones six arrested psd 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधाच्या साठयाबद्दल आरोग्य मंत्रालयाने दिली अत्यंत महत्वाची माहिती…
2 चालू वर्षात सरकारनं आयकर रद्द करावा; निलेश राणे यांची मागणी
3 “माझ्यावर प्रेम असेल तर एवढंच करा…”; पंतप्रधान नरेंद्र मोदींच आवाहन
Just Now!
X