24 September 2020

News Flash

सिंधू नदी करारासंदर्भात मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

पाकिस्तानची कोंडी करण्याची रणनिती भारताने आखली असल्याने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

मोदींनी सिंधू नदी पाणी वाटप कराराविषयी सोमवारी उच्चस्तरीय बैठक घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू नदी पाणीवाटप करारासंदर्भात सोमवारी वरिष्ठ अधिका-यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. उरी हल्ल्यानंतर हा करारच रद्द करुन पाकिस्तानची पाणीकोंडी करण्याची रणनिती भारताने आखली असल्याने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण झालेत. कोणत्याही सहकार्यात्मक करारासाठी परस्परांत विश्वास आणि सहकार्य असणे आवशयक आहे. करार हे कधीही एकतर्फी होऊ शकत नाही अशी सूचक प्रतिक्रिया परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिली होती. त्यामुळे भारत हा करारच रद्द करणार की काय असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी आज परराष्ट्र सचिव एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, जलसंधारण विभागाचे सचिव आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत काय निर्णय झाला हे मात्र समजू शकलेले नाही.
काय आहे सिंधू नदी करार
भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी १९ सप्टेंबर १९६० रोजी सिंधू नदी पाणीवाटप करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला होता. भारतातून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या बियास, रावी, सतलज, सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांच्या पाणीवाटपाची तरतूद करण्यात आली. करारानुसार बियास, रावी आणि सतलज या तीन पूर्वेकडील नद्यांचे पाणी भारत विनाअट वापर करू शकतो. तर सिंधू, चिनाब आणि झेलम या तीन पश्चिमेकडील नद्यांचे पाणी पाकिस्तान प्राधान्याने वापरू शकतो. या सर्व नद्याचे मिळून जवळपास ८० टक्के पाणी पाकिस्तानला मिळते आणि भारत केवळ २० टक्केच पाणी वापरतो. त्यामुळे हा करार रद्द झाल्यास भारतावर जागतिक स्तरावरुन दबाव येऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 3:47 pm

Web Title: indus waters treaty pm narendra modi chairs meeting with nsa ajit doval other senior officials
Next Stories
1 काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर ग्रेनेड हल्ला; पाच जवान जखमी
2 video: राहुल गांधी यांच्या दिशेने बूट फेकला, आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
3 …मग मोदींच्या पंतप्रधान असण्याला काय अर्थ ? – राहुल गांधी
Just Now!
X