News Flash

निर्मला सीतारमण यांनी जाहीरपणे सुनावल्यानंतर इन्फोसिसचं आश्वासन; म्हणाले…

निर्मला सीतारमण यांच्या नाराजीनंतर नंदन नीलेकणी यांनी व्यक्त केली खंत

निर्मला सीतारमण यांच्या नाराजीनंतर नंदन नीलेकणी यांनी व्यक्त केली खंत (Photo: PTI)

करदात्यांकडून प्राप्तिकर ई-फायलिंग वेबसाईटवर अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विटरवरच जाहीर नाराजी व्यक्त केली. निर्मला सीतारमण यांनी इन्फोसिस टेक्नॉलॉजीज आणि विद्यमान अध्यक्ष नंदन नीलेकणी यांना जाहीरपणे जाब विचारत, अडचणी तात्काळ दूर करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर इन्फोसिसने नंदन नीलेकणी यांनी खंत व्यक्त केली असून काही दिवसांतच संपूर्ण व्यवस्था सुरळीत होईल असं आश्वासन दिलं आहे.

नवीन ‘ई-फायलिंग’ संकेतस्थळाविरोधात पहिल्याच दिवशी तक्रारींची रीघ

निर्मला सीतारमण यांच्या ट्विटला उत्तर देताना नंदन नीलेकणी यांनी म्हटलं आहे की, “निर्मला सीतारमणजी नवीन ई-फायलिंग पोर्टल फायलिंग प्रक्रिया सुलभ करेल तसंच वापरकर्त्यांना चांगला देईल. पहिल्या दिवशी काही तांत्रिक त्रुटी आमच्या लक्षात आल्या असून त्यांचे निराकरण करण्याचे काम करत आहोत. आलेल्या अडचणींबद्दल इन्फोसिस खेद व्यक्त करत असून पुढील आठवड्यात यंत्रणा स्थिर होईल अशी आशा आहे”.

नेमकं काय झालं –

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सुलभ, सोपी व गतिमान करण्याच्या उद्देशाने सोमवारी सायंकाळी नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्राप्तिकर ई-फायलिंग संकेतस्थळाचा पहिली अनुभूती मात्र करदात्यांसाठी त्रासदायकच ठरली. पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या तक्रारींची रीघ पाहता, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे संकेतस्थळ विकसित करणाऱ्या इन्फोसिस टेक्नॉलॉजीज आणि तिचे विद्यमान अध्यक्ष नंदन नीलेकणी यांना जाहीरपणे जाब विचारत, अडचणी तात्काळ दूर करण्याचे निर्देश दिले.

वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी प्रणालीसाठी ‘जीएसटी नेटवर्क (जीएसटीएन)’ संकेतस्थळ तयार करणाऱ्या इन्फोसिसवर, २०१९ साली प्राप्तिकराच्या ई-भरणा करणारी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. करदात्यांकडून दाखल होणाऱ्या विवरण पत्रावर प्रक्रियेचा कालावधी सध्याच्या ६३ दिवसांवरून एक दिवसांवर आणून, त्यायोगे कर-परतावा (रिफंड) वितरित करण्याची प्रक्रियाही गतिमान करण्याचे उद्दिष्ट यामागे होते. त्यानुसार तयार केले गेलेले नवीन संकेतस्थळ सोमवारी रात्रीपासून कार्यान्वितही झाले. मात्र नवीन ई-फायलिंग संकेतस्थळावर लॉग इन करण्यात असमर्थता आणि त्याच्या वापरासंबंधाने अनेक प्रकारच्या अडचणींचा करदात्यांना सामना करावा लागत असल्याने मंगळवार सकाळपासूनच अर्थमंत्री सीतारामन यांच्या ट्विटर टाइमलाइनवर तक्रारींची रीघ लागली.

अर्थमंत्र्यांनी ट्वीटद्वारेच या बाबतीत आपला संताप व्यक्त केला. ‘इन्फोसिस आणि नंदन निलेकणी हे दर्जेदार व गुणात्मक सेवेची अपेक्षा राखणाऱ्या करदात्यांचा हिरमोड करणार नाहीत अशी आशा आहे,’ असे त्यांनी ट्वीट केले होते.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनीच केली होती घोषणा

दरम्यान, सोमवारी रात्री हे वेब पोर्टल सुरू झाल्यानंतर खुद्द निर्मला सीतारमण यांनीच ट्वीट करून यासंदर्भातली माहिती करदात्यांना दिली होती. “बहुप्रतिक्षित e-filing portal 2.0 काल रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी सुरू झालं आहे. करदात्यांना करभरणा प्रक्रिया सुलभ करण्याच्या व्यवस्थेमधला हा मैलाचा दगड ठरला आहे. हे पोर्टल देशवासीयांच्या सेवेसाठी आहे”, असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यानंतर काही तासांतच त्यांना इन्फोसिसला तांत्रिक बिघाडावरून सुनवावं लागलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 8:59 am

Web Title: infosys co founder nandan nilekani finance minister nirmala sitharaman tax site e filing portal sgy 87
Next Stories
1 उत्तर प्रदेश : बस आणि टेम्पोच्या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू; मोदी-योगींनी जाहीर केली मदत
2 PM Modi changed Covid vaccine policy : लसवाटपाचे नवे धोरण
3 व्यापक लसीकरण हाच उपाय
Just Now!
X