ब्रसेल्सच्या झावेनटेम विमानतळावर झालेल्या बाँबहल्ल्यात दगावलेल्या भारतीयांमध्ये एकही भारतीय नागरिक नसल्याचे निर्वाळा भारताचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिला आहे. दरम्यान या हल्ल्यात भारतीय नागरिक मात्र जखमी झाला असून मूळचा भारतीय असलेला आणि ब्रसेल्समध्ये इन्फोसिसमध्येकार्यरत असलेला राघवेंद्र गणेशन या हल्ल्यात बेपत्ता असल्याचे पुढे आले आहे. याचा शोध घेण्यात येत असल्याचे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. दरम्यान घटनास्थाळावरून १५ किलो दारुगोळा सापडला असून या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली आहे.
विमानतळावर विस्फोटक सामग्रीसह असलेला तिसरा संशयित पळाल्याचे फ्रेडल अधिवक्तयाने आज स्पष्ट केले. तिसरा मनुष्य विमानतळावर होता आणि त्याने त्याची बॉम्ब असलेली बॅग विमानतळावरच सोडल्याचे फ्रेडेरिक व्ॉन लू म्हणाले. संशयिताने काळी टोपी आणि पांढरा कोट चढवला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले आहे. त्याची ओळख अद्याप पटायची असून त्याचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सापडलेल्या संशयितांमध्ये इब्राहिम अल बक्राउ आणि त्याचा भाऊ खालिदचा समावेश आहे.
पकडण्यात आलेल्या दोन संशयित मानवी बॉम्बर्सचा संबंध थेट आयसिसच्या दहशतवाद्यांशी असल्याचे माध्यमांनी बुधवारी नमूद केले. नाजिम लाचराऊ ( २५) हा तिसरा ट्रॉली घेऊन जाणारा संशयित असल्याचा संशय होता. बेल्जिअम पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर तो लाचराऊ नसल्याचे सिद्ध झाले. पोलीस आणि अधिवक्तयांनी ताबडतोब प्रतिक्रिया देण्याचे टाळले. दरम्यान, या बॉम्बहल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३१ असून जखमींची संख्या मात्र २६० वर पोहोचली आहे. जगभरातून या घटनेचा निषेध होत आहे.
दरम्यान, बेल्जिअम पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इब्राहिम अल बक्राउ आणि त्याचा भाऊ खालिदला गुन्हेगारी पाश्र्वभूमी असली तरी त्यांचा यापूर्वी इस्लामिक दहशतवाद्यांशी संबंध नसल्याचे सिद्ध झाले आहे. पॅरिस हल्ल्याप्रकरणी लाचराऊचा शोध सुरू असून त्याचा डीएनए दोन ठिकाणच्या हल्ल्यात सापडला आहे.