इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर महिनाभरातच कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय राजगोपालन यांनी राजीनामा दिला आहे. राजगोपालन हे सिक्का यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जात आहेत.

सिक्का यांनी राजीनामा दिल्यानंतर राजगोपालन हेही राजीनामा देतील, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. इन्फोसिसमध्ये येताना सिक्का यांनी ‘एसएपी’ (SAP) कंपनीतून काही विश्वासू सहकाऱ्यांना बरोबर आणले होते. राजगोपालन हेही त्या अधिकाऱ्यांपैकीच एक होते. २०१४ मध्ये ते इन्फोसिसमध्ये रुजू झाले होते. त्यांनी तीन वर्षे काम केल्यानंतर इन्फोसिसमधील वरिष्ठ उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ‘लिंक्डइन’वरील प्रोफाईलमध्ये आपण आता ‘मुक्त’ झालो आहे, असे म्हटले आहे. ऑगस्ट २०१४ ते सप्टेंबर २०१७ अशी साधारण तीन वर्षे दोन महिने आपण इन्फोसिसमध्ये वरिष्ठ उपाध्यक्षपदावर काम केले आहे, असेही त्यांनी त्यात नमूद केले आहे.

shekhar charegaonkar fraud marathi news
राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, गुंतवणूकदारांची फसवणूक
ajit pawar ncp s mla, dilip mohite, collector office, amol kolhe, nomination form, shirur lok sabha constituency, lok sabha 2024, election 2024, shirur news, politics news, pune news,
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या ‘टायमिंग’मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
satej patil , raju shetty
साखरपुडा – लग्नावरून सतेज पाटील – राजू शेट्टी यांच्यात जुंपली
Former District Congress President Prakash Devtale joins BJP
जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, महिनाभरापूर्वी सिक्का यांनी आपल्या चांगल्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत मुख्य कार्यकारीपदाचा राजीनामा दिला होता. माझ्या कामात सातत्याने अडथळे निर्माण करण्याचे काम केले जात आहे, असेही त्यांनी राजीनामा देताना म्हटले होते.