हाथरसमध्ये सोमवारी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली. सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी संजय सिंह हाथरसमध्ये गेले होते, त्यावेळी ही घटना घडली. पीडित तरुणीचा मागच्या आठवड्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हाथरसला गेलेले संजय सिंह, पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन घरातून बाहेर पडल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावर शाई फेकली. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीच्या नेत्याच्या शिष्टमंडळाने पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना धीर दिला.
आणखी वाचा- संवादातून समस्या सोडवण्याचं मुख्यमंत्री म्हणाले, मग…; प्रियंका गांधींचा योगींना सवाल
कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर घराबाहेर संजय सिंह प्रसारमाध्यमांशी बोलत असताना तिथे असलेल्या एका व्यक्तीने संजय सिंह यांच्या अंगावर शाई फेकली. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्या व्यक्तीला पकडले व ताब्यात घेतले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 5, 2020 4:33 pm