पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याच्यावर शनिवारी एका व्यक्तीने शाई फेकली. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये ही घटना घडली. घटनेनंतर उपस्थीत लोकांनी शाई फेकणा-या तरूणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. हार्दिक पटेल सध्या मध्य प्रदेशच्या दौ-यावर असून तेथील शेतक-यांशी तो संपर्क साधत आहे.
मध्य प्रदेशमध्ये वर्षाच्या अखेरीस होणा-या निवडणुकीत हार्दिकने कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना समर्थन दिलं आहे. जर कॉंग्रेसने ज्योतिरादित्य सिंधिया यांना मुख्यमंत्रीपदाचं उमेदवार घोषीत केलं तर आम्ही विरोध करणार नाही असं हार्दिक शुक्रवारी मंदसौर येथे एका कार्यक्रमात म्हणाला होता.
त्यापूर्वी शनिवारी हार्दिकने ट्विटरद्वारे मला शेतक-यांना भेटण्यापासून रोखलं जात असल्याचा आरोप केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 8, 2018 8:34 am