27 February 2021

News Flash

दिल्लीत दहशतवादी घुसल्याचा संशय; गुप्तचर यंत्रणाकडून अॅलर्ट जारी

पाच ते सहा दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वीपासूनच त्यांचा शहर परिसरात वावर असल्याची माहिती आहे.

संग्रहित छायाचित्र

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत दहशतवादी घुसल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राजधानी परिसरात अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. हे ५ ते ६ दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वीपासूनच त्यांचा शहर परिसरात वावर असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांचा नेमका ठावठिकाणा अद्याप गुप्तचर यंत्रणांना कळू शकलेला नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुज्जाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचे सदस्य आहेत. त्यांच्याजवळ स्फोटकं असण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील गर्दीची ठिकाणे जसे आयएसबीटी, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन आणि इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळ येथे अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्याचबरोबर दिल्लीतील मॉल्स, मल्टीप्लेक्स आणि मंदिरांसारख्या सार्वजनिक ठिकाणांच्याही सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्यावतीने १५ जिल्ह्यांचे डीसीपी आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांना २६ जानेवारीपर्यंत आपापल्या परिसरात रात्रीच्या वेळेत अधिकाधिक गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून लोकांची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 10:00 am

Web Title: inputs of terrorist presence in delhi and nearby areas police on alert
Next Stories
1 लोकसभा निवडणूक लढवणार का? करिना कपूर म्हणते…
2 अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा कट?
3 सीबीआयच्या २० अधिकाऱ्यांच्या बदल्या; हंगामी संचालक नागेश्वर रावांचा निर्णय
Just Now!
X