भारतीय नौदलातील आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला झालेल्या अपघाताची नैतिक जबाबदारी स्विकारत नौदलाचे प्रमुख अॅडमिरल डी.के.जोशी यांनी राजीनामा दिला आहे.
पाणबुडी असते तरी कशी?
सुत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री ए.के.अँटनी यांनी सिंधुरत्न अपघाताबद्दल नौदलप्रमुखांना समन्स बजावले आणि झालेल्या घटनेची जबाबदारी घेत डी.के.जोशींनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. ए.के.अँटनी यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची भेट घेऊन संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली आणि डी.के.जोशींचा राजीनामा स्विकारण्यात आला. तसेच व्हाइस अॅडमिरल आर.के.धोवन यांच्याकडे नौदलाची सुत्रे सोपविण्यात आली आहेत.
डी.के.जोशी राजीनामा पत्रात म्हणतात की,
मागील दुर्घटनांची मी नैतिक जबाबदारी घेतो. या अपघातांमुळे भारतीय नौदलाच्या प्रतिमेला धक्का बसला तरीही आजपर्यंत सरकारने माझ्यावर पूर्ण विश्वास आणि पाठिंबा दिला. परंतु, झालेल्या घटनांची एकंदर जबाबदारी माझ्यावरच आहे. त्यामुळे नौदल प्रमुखपदाचा राजीनामा देत आहे. 
‘आयएनएस सिंधुरत्न’ला अपघात