‘गोर्शकोव्ह’ ही रशियन बनावटीची बहुप्रतिक्षित विमानवाहू युद्धनौका लवकरच भारतीय नौदलात दाखल होणार आह़े  गुरुवारी रशियात या नौकेच्या अंतिम चाचणीला सुरुवात झाली़  या वर्षअखेरीस भारतीय नौदलात दाखल करताना या नौकेचे नामकरण ‘आयएनएस विक्रमादित्य’ असे करण्यात येणार आह़े
‘गोर्शकोव्ह’ची अंतिम चाचणी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार असून, ही चाचणी तीन महिने चालण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती नौदलातील सूत्रांनी दिली़.
वास्तविक ही नौका २००८ साली भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात येणार होती़  परंतु, नौकेच्या निर्मितीत बराच वाढीव खर्च आणि वेळ लागण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर ही नौका २०१३च्या अखेरीसच भारताकडे देणे शक्य असल्याचे रशियाकडून कळविण्यात आले होत़े  त्यानुसार भारताकडे हस्तांतर करण्याच्या दृष्टीने या नौकेची अंतिम चाचणी सुरू झाली आह़े  या चाचणीसाठी नौदलाने युद्धनौका तपासणी पथकासह काही तज्ज्ञ अधिकाऱ्यांनाही रशियात पाठविले आह़े  या नव्या नौकेसाठी ४५ मिग-२९ विमानांच्याही खरेदीचा करार भारताने रशियाशी केला आह़े  ‘गोर्शकोव्ह’ दाखल होण्याआधी नौदलाने ही विमानांची दाखल करून घेण्यास सुरुवात केला आह़े  कारवार येथे युद्धनौकांचा तळ आह़े   त्यात दाखल होणाऱ्या या नव्या नौकेसाठी जागा करण्यात येत आह़े