News Flash

आरटी-पीसीआर चाचण्यांची खातरजमा करण्याची सूचना

आरटी पीसीआर चाचण्यात सहसा दोन उत्परिवर्तनी विषाणूचे निदान चुकत नाही

(संग्रहित छायाचित्र)

कोविड-१९ विषाणूचे रुग्ण वाढत असून सुमारे ८० टक्के प्रकरणांत आरटी- पीसीआर चाचण्या सकारात्मक येत आहेत, त्यामुळे आता लक्षणे दाखवत असलेल्या रुग्णात ‘चुकीच्या निगेटिव्ह’ चाचण्यांचा शोध घेण्यासाठी सीटी स्कॅन व क्ष किरण चाचण्यांचा आधार घेण्यात यावा. त्या आधी २४ तासांच्या अंतराने एकदा चाचणी करून घ्यावी, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

सार्स सीओव्ही-२ चा विशेष काळजी करायला लावणारा विषाणू सध्या पसरत आहे. आरटी पीसीआर चाचण्यात सहसा दोन उत्परिवर्तनी विषाणूचे निदान चुकत नाही. देशात १५ एप्रिलपर्यंत ११८९ रुग्ण हे काळजी करावी अशा विषाणूचे असून त्यात ७९ रुग्ण हे दक्षिण आफ्रिकन व ब्राझीलच्या विषाणूचे आहेत. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या माहितीनुसार सध्याचे विषाणू आरटी-पीसीआर चाचणीत कळतात. या चाचणीची संवेदनशीलता ८० टक्के आहे. त्यामुळे २० टक्के रुग्ण ‘चुकीने निगेटिव्ह’ म्हणजे नकारात्मक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी संबंधित रुग्णाची २४ तासांत दुसऱ्यांदा चाचणी करून घ्यावी. नंतर सीटीस्कॅन व क्ष किरण तपासणीचा आधार घ्यावा. अनेकदा नमुना योग्य प्रकारे घेतला जात नाही किंवा काही वेळा विषाणूंची संख्या कमी असताना चाचणी केली जाते. तेव्हा ती नकारात्मक येते ती चुकीची नकारात्मक चाचणी असते. परिणामी रुग्ण त्या आरटी-पीसीआरमध्ये नकारात्मक येतो. जर रुग्णात लक्षणे दिसत असतील, तर प्रयोगशाळेतील चाचण्या,सीटी स्कॅन, छातीचे क्ष किरण छायाचित्र यांचा वापर प्राथमिक पातळीवर करून नंतर २४ तासांनी आरटी- पीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे.

अन्य चाचण्यांकडेही लक्ष

संसर्गजन्य रोग आजार विषयक संस्थेचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी सांगितले की, ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका येथील विषाणूंचे प्रकार आरटी-पीसीआर चाचणीला चकवा देऊ शकत नाहीत. पण भारतात दोन उत्परिवर्तनाचा विषाणू सापडला असून तो चाचणीतून सुटण्याचा काहीसा धोका आहे. त्यामुळे काही व्यक्ती संसर्गबाधित आढळत नाहीत. तो धोका टाळण्यासाठी क्ष किरण व सीटीस्कॅन चाचण्या तसेच २४ तासांच्या अंतराने आरटी-पीसीआर चाचणी काहींच्या बाबतीत करावी लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 12:04 am

Web Title: instructions for confirming rt pcr tests abn 97
Next Stories
1 काँग्रेसशासित राज्यांकडून लशींबाबत शंका घेण्याचे प्रकार
2 नासाच्या हेलिकॉप्टरचे मंगळावर यशस्वी उड्डाण
3 दुहेरी उत्परिवतर्नचा विषाणू आता देशात सार्वत्रिक
Just Now!
X