अहमदाबाद मोटेरा येथील सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमचे नवीन नामकरण करण्यात आले आहे. या स्टेडियमचे नरेंद्र मोदी असे नामकरण करण्यात आले आहे. त्यावरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये शाब्दीक वाद सुरु झाला आहे. नव्याने पुनर्विकसित करण्यात आलेल्या या स्टेडियमचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचं नामकरण करण्यात आलं आहे. या स्टेडियमला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे सरदार पटेल स्पोटर्स एनक्लेव्हमध्ये असणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमभोवती हे एनक्लेव्ह उभे राहणार आहे. त्यात अन्य क्रीडा प्रकारांसाठी सुद्धा सुविधा असतील.

स्टेडियमला मोदींचे नाव देण्याच्या निर्णयावर टीका करताना काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला आहे. “भाजपाच्या मातृ संघटनेवर बहिष्कार घालणाऱ्या गृहमंत्र्यांच्या नावाने हे स्टेडियम असल्याचे आता त्यांच्या लक्षात आले असावे, किंवा ट्रम्प यांच्याप्रमाणे दुसऱ्या देशाच्या प्रमुखाचे इथे आदिरातिथ्य करण्यासाठी ही अ‍ॅडव्हान्स बुकिंग असावी” असे खासदार शशी थरुर यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

दुसऱ्याबाजूला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीचे आभार मानले आहेत. क्रिकेट खेळच नाही, तर धर्म असलेल्या देशात जगातील सर्वात मोठे स्टेडियम देशाला अर्पण करण्याच्या निर्णयाचे शिवराज सिंह चौहान यांनी कौतुक केले आहे.

सरदार पटेल स्टेडियमचे नामांतर करण्याच्या निर्णयावरुन हार्दिक पटेल यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. ते गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आहेत. “अहमदाबादमध्ये असलेल्या जगातील सर्वात मोठ्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. हा सरदार पटेलांचा अपमान नाही ? सरदार पटेलांच्या नावावर मत मागणारी भाजपा आता सरदार साहेबांचा अपमान करत आहे. गुजरातची जनता सरदार पटेलांचा अपमान सहन करणार नाही” असे हार्दिक पटेल यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे. “सरदार पटेलांप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी सोनिगा गांधी आणि अन्य नेत्यांनी केवडीयाला कधीही भेट दिलेली नाही. पण आता ते सरदार पटेलांचा अपमान केल्याचे बोलत आहेत.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Insult to sardar patel congress slam bjp over renaming of sardar patel cricket stadium dmp
First published on: 24-02-2021 at 19:06 IST